Nashik News : अनोख्या मडबाथचा शेकडोंनी लुटला आनंद!

mud bath nashik
mud bath nashikesakal

Nashik News : चामरलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या नंदिनी डेअरी फार्म येथे सालाबादप्रमाणे झालेल्या मडबाथचा (माती स्नानाचा) आबालवृद्धांसह हजारो लोकांनी आनंद लुटला. संगीताच्या तालावर नाचून लोकांनी आपला आनंद द्विगुणित केला. (Mud Bath was enjoyed by thousands of people nashik news)

लोकांच्या संपूर्ण शरीरावर चिखलाचा थर पाहून दुर्गम भागातून हे सारे लोक आले किंवा काय असेच या भागातून येणाऱ्या जाणाऱ्यांना वाटत होते. आपल्या लोकांनाही ओळखणे कठीण जात होते असा हा नजारा होता.

महेश शहा, चिराग शहा तसेच योगगुरुजी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नंदू देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने गत २६ वर्षांपासून या आगळावेगळा कार्यक्रम होत आहे. मध्यंतरी कोरोनामुळे दोन वर्षे या उत्सवात खंड पडला होता. मात्र गेल्यावर्षांपासून पुन्हा हा उत्सव सुरू झाला. यंदाही लोकांचा उत्साह दिसला.

मुंबई, पुणे तसेच, राज्याच्या काही भागातील आणि नाशिक महानगरातील सुमारे हजार नागरिकांनी मडबाथचा आनंद लुटला. हनुमान जन्मोत्सवानंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी सालाबादाप्रमाणे हा कार्यक्रम होतो. यासाठी महिनाभर आधीपासून या कार्यक्रमाची तयारी करण्यात येते. वारुळाची माती गोळा केली जाते. आठ दिवस आधी ती भिजवली जाते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

mud bath nashik
Nashik News : सिन्नर- शिर्डी मार्गावरील टोलचा वाजला ढोल; वाहनधारकांना भुर्दंड

शरीराला ती लावून अंघोळ करण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे शरीरातील सर्व उष्णता निघून जाते आणि त्वचा चकचकीत होते, असे नंदू देसाई यांनी सांगितले. सकाळी साडेपाचपासून हा कार्यक्रम सुरु झाला. बघता बघता नागरिक गर्दी करू लागले. स्वतःच्या अंगाला चिखल फासू लागले. पूर्वी एका पाटीत चिखल घेऊन प्रत्येकाला वैयक्तिकरित्या तो फासावा लागत होता.

मात्र यावेळी २५ फूट लांबीचा खास टब तयार करण्यात आला होता, त्यात चिखल होता. या टबमध्ये ३० लोक एकाचवेळी उतरून व अंगाला चिखल लावून बाहेर येत होते. नंतर दोन तास उन्हात उभे राहून चिखल वाळल्यानंतर तेथे खास बसविण्यात आलेल्या शॉवरखाली उभे राहून मडबाथचा आनंद लुटत होते.

मडबाथ घेणाऱ्या मान्यवरांमध्ये माजी पोलिस आयुक्त हरीश बैजल, प्रदीप पाटील, ॲड. धर्मेंद्र चव्हाण, डॉ. ज्ञानेश्वर चोपडे, वैभव शेटे, अमित घुगे, ज्येष्ठ पत्रकार प्रियदर्शन टांकसाळे, योगेश कमोद, किशोर बेलसरे, संदीप जाधव, विजय पाटील आदींसह नाशिक सायकलिस्ट, जॉगर्स ग्रुप, जल्लोष ग्रुप, पंचवटी व्यापारी ग्रुप, नाशिक इको ड्राईव्ह, चामरलेणी इको ड्राईव्ह, मुंबई ग्रुप आदी ग्रुपचे सदस्य आदींचा समावेश होता.

mud bath nashik
Market Committee Election : गावोगावी बैठकांना जोर, मन वळविण्याची कसरत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com