नाशिक- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र- २०२५ च्या दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार २८ जूनपासून २३ जुलैदरम्यान राज्यातील एकूण १६८ परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या परीक्षेला ८० हजार ६५४ विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. हिवाळी सत्र परीक्षेप्रमाणे यंदाही परीक्षेच्या दिवशी प्रश्नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रावर पाठविल्या जाणार आहेत.