नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे उन्हाळी सत्र २०२५ च्या तिसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षेचे आयोजन शनिवार (ता. २)पासून १८ ऑगस्टदरम्यान केले आहे. राज्यातील सुमारे साडेआठ हजार विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातील. गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षेच्या दिवशीच संबंधित परीक्षा केंद्रावर ऑनलाइन प्रश्नपत्रिका पाठविली जाणार आहे.