धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H33108
धुळे : मुक्तेश्वर महादेव मंदिरासमोर गरबा नृत्यात सहभागी तरुणी, महिला.
---
मुक्तेश्वर महादेव मंदिरात गरबा विजेत्यांचा गौरव
---
नवरात्रोत्सवाची सांगता; नऊ ज्येष्ठ महिलांचा ‘नवदुर्गा’ म्हणून सन्मान
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २० : शहरातील चितोड रोड भागातील लीलाबाई चाळ स्मशानभूमीलगतच्या श्री मुक्तेश्वर महादेव मंदिर नवरात्रोत्सव समितीतर्फे नऊ दिवस गरबा आणि दांडियाचा उत्साह रंगला. शेकडो महिला व तरुणींनी यात सहभाग घेतला. सोमवारी (ता. १९) रात्री या नवरात्रोत्सवाची सांगता झाली. यावेळी विविध गरबा प्रकारांतील विजेत्यांना गृहोपयोगी वस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच, नऊ ज्येष्ठ महिलांचा साडी देवून ‘नवदुर्गा’ म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला.
---
मंदिराचे संस्थापक मनोज गर्दे यांच्या उपस्थितीत आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. पारंपरिक वेशभूषा प्रकारात जान्हवी मोहिते, तेजस्विनी नरसिंगे, सृष्टी पवार, सपना काळे, श्रद्धा सोनवणे, शीतल महेंद्र देवरे, दिशा सोनार, सिद्धी हटकर आणि काजल सोनार यांना गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट टिपरी प्रकारात मनीषा थोरात, हर्षदा भावसार, सायली पांचगे, रुचिता पाकळे, अश्विनी गायकवाड आणि लता गायकवाड यांनी बक्षिसे मिळविली. पहिल्यापासून शेवटपर्यंत गरबा, दोन टिपरी आणि बारा टिपरी प्रकारांत जया भोईटे, सोनाली वारेकर, उषा चव्हाण, वैशाली कुसळकर, मनीषा पाटील, सुजिता वाघ, तन्वी निकम आणि राणी मिस्तरी यांना गृहोपयोगी वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. संपूर्ण नवरात्रोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलेला स्व. द्वारकाआई उत्तमराव गर्दे यांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह देण्यात आले.
समितीचे सहकार्य
मंदिराचे संस्थापक श्री. गर्दे, मंदिराचे मुख्य पुजारी दिव्येश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवरात्रोत्सव साजरा झाला. समिती अध्यक्ष कविता परदेशी, उपाध्यक्ष पूजा गर्दे व कोमल परदेशी, सचिव भारती भावसार, कोशाध्यक्ष शुभांगी पाटील यांनी नियोजन केले. गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष भोला परदेशी, उपाध्यक्ष सुनील पाटील, दर्शन बागले, दिनेश निकम, भय्या परदेशी, रोहित गर्दे आणि समाधान पाकळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. गरबा कार्यक्रमासाठी जितू मराठे यांनी ध्वनिसंयोजन केले.
---