डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा मुक्तीभूमीचा विचार आजही प्रेरणादायी मंत्री संजय शिरसाठ :

डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा मुक्तीभूमीचा विचार आजही प्रेरणादायी मंत्री संजय शिरसाठ :
Published on: 
पान-१ मेन करणे ----------------- YEO26B27144 येवला : धर्मांतर घोषणेच्या वर्धापनदिनी मंगळवारी मुक्क्तीभूमीवर अभिवादन करताना मंत्री संजय शिरसाठ. समवेत आमदार किशोर दराडे, नरेंद्र दराडे, कुणाल दराडे आदी ------------------- मुक्तीभूमीचा विचार आजही प्रेरणादायी मंत्री संजय शिरसाठ : वर्धापन दिनानिमित्त मुक्तीभूमीवर नतमस्तक होत केले अभिवादन ------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१३ : बाबासाहेबांनी ९१ वर्षांपूर्वी मुक्तीभूमीतून केलेल्या धर्मांतराच्या घोषणेचा प्रभाव पुढे नागपूरच्या दीक्षाभूमीवरही जगाने अनुभवला. आजही खेड्यापाड्यांतील गरीब जनता बाबासाहेबांनी आपल्याला गुलामीतून मुक्त करून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, या भावनेतून मुक्तीभूमीवर नतमस्तक होण्यासाठी येते. बाबासाहेबांच्या विचारांनी वंचित आणि शोषित समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली असून, या ऐतिहासिक भूमीचे महत्त्व आजही कायम असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी केले. ---------------- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराच्या ऐतिहासिक घोषणेच्या ९१ व्या वर्धापनदिनानिमित्त मुक्तीभूमीवर आयोजित अभिवादन सोहळ्यास मंत्री शिरसाट यांनी भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. स्तुपाला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे, युवा नेते कुणाल दराडे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय जैन, शहराध्यक्ष विशाल परदेशी, तालुकाध्यक्ष पांडुरंग शेळके, अर्जुन जावळे, मोहफिज अत्तर, मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष सुभाष गांगुर्डे, शहर उपाध्यक्ष विजय मोरे, यश जगताप, हितेन जावळे, गणेश कोटमे, महिला शहरप्रमुख सुनीता लहरे आदी उपस्थित होते. बाबासाहेबांच्या घोषणेमुळे येवल्याच्या भूमीला ऐतिहासिक महत्त्व मिळाले असून समाजबांधवांसाठी ही पवित्र भूमी झाल्याने आज लाखो अनुयायी विनाचप्पल येऊन या भूमीत नतमस्तक होत असल्याची भावना मंत्री शिरसाठ यांनी व्यक्त केली. मुक्तीभूमीवर मोठी विकासकामे झाली असून येथील पाण्याची व्यवस्था उपलब्ध करावी अशा सूचना त्यांनी केल्या. १६-१ विमा कंपन्यांनी कार्यवाही करावी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीविषयी बोलताना शिरसाट यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. दुष्काळामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असला तरी एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे. पीक विमा कंपन्यांच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विमा कंपन्यांनी नियमांनुसार कार्यवाही करावी आणि पात्र शेतकऱ्यांना मदतीपासून दूर ठेवू नये, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. २०-२ चौकट धनुष्यबाण गोठविण्याची मागणी दुर्दैवी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आमदार अपात्रतेच्या वादाविषयी बोलताना शिरसाट यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या निकालाबाबत विश्वास व्यक्त केला. आम्ही आमची प्रतिज्ञापत्रे आणि आवश्यक कागदपत्रे नियमांनुसार सादर केली आहेत. त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धनुष्यबाण हे शिवसेनेचे अधिकृत चिन्ह गोठवण्याच्या मागणीवर टीका करताना त्यांनी या मागणीला दुर्दैवी ठरवले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी धनुष्यबाण या चिन्हाचे असलेले भावनिक नाते लक्षात घेता, ते गोठवण्याची मागणी करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. तेजस ठाकरे राजकारणात आले, तर त्यांचे स्वागतच आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. १६-१ मुक्तीभूमीच्या समस्या मांडल्या मुंबई महानगरपालिकेच्या निधीत चार हजार कोटी रुपयांची घट झाल्याच्या मुद्द्यावर विचारले असता, ही घट नेमकी का आणि कशी झाली, याची तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षण करावे लागेल, असे शिरसाट यांनी सांगितले. दिल्लीतील जंतरमंतर येथील आंदोलनाने सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आंदोलनांचा परिणाम होऊ नये, अशी भूमिका मांडली. आंदोलनांमुळे मेट्रो आणि रेल्वे सेवांवर परिणाम होऊन प्रवाशांना वाहतूक कोंडी व अन्य अडचणींचा सामना करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. आमदार किशोर दराडे व सहकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मंत्री शिरसाठ यांना दिले तसेच मुक्तीभूमीवरील विविध सुविधांसह समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. -------------------- --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com