मुक्तीभूमीवरच्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेला ९१ वर्षे पूर्ण!

मुक्तीभूमीवरच्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेला ९१ वर्षे पूर्ण!
Published on: 
मुख्य अंक पान ३ ----------- धर्मांतर घोषणा वर्धापनदिन विशेष--लोगो --------------- YEO26B27132 येवला : ऐतिहासिक मुक्तीभूमीवरील पुतळा. ---------------- मुक्तीभूमी बनले स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठेचा विचार जपणारे प्रेरणास्थान -------- मुक्तीभूमीवरील ऐतिहासिक घोषणेला ९१ वर्षे पूर्ण ः आज वर्धापनदिनानिमित्त अनुयायी होणार नतमस्तक ----------- संतोष विंचू ः सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१२ : अन्यायाच्या बेड्या झुगारून समता, स्वाभिमान आणि मानवी मुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी येवल्यातील मुक्तीभूमी सज्ज झाली आहे. ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,’ अशी सामाजिक क्रांतीची दिशा देणारी घोषणा बाबासाहेबांनी १३ ऑक्टोबर १९३५ ला याच भूमीत केली होती. या ऐतिहासिक घटनेच्या ९१ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे हजारो अनुयायी मुक्तीभूमीवर येऊ लागले आहेत. महामानवाला नतमस्तक होऊन अभिवादन करतील. ------------ येथील न्यायालयाच्या मैदानावर ९१ वर्षांपूर्वी मुंबई इलाखा दलित वर्गीय परिषद भरली होती. तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेच्या अमानुष प्रथेविरुद्ध आणि सामाजिक विषमतेविरुद्ध निर्णायक भूमिका मांडली. हिंदू धर्मातील जातीय विषमता आणि अस्पृश्यतेच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी धर्मांतराचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार त्यांनी याच ठिकाणी जाहीर केला. त्यांच्या घोषणेने देशाच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवली. वंचित समाजाच्या आत्मसन्मानाची आणि समतेच्या लढ्याची ही घोषणा पुढील काळातील परिवर्तनाच्या चळवळीचा ऐतिहासिक टप्पा ठरली. एका ऐतिहासिक घोषणेने समतेच्या लढ्याला नवी दिशा दिली, तर एका विचाराने लाखो शोषितांच्या जीवनात स्वाभिमानाची पहाट उजाडली ती १३ ऑक्टोबर १९३५ ला. १६-१ परिवर्तनाचा ऐतिहासिक प्रवास जगाच्या इतिहासात सामाजिक परिवर्तनाचा मैलाचा दगड ठरलेल्या या घोषणेनंतर डॉ. आंबेडकरांनी विविध धर्मांचा सखोल आणि तौलनिक अभ्यास केला. त्यानंतर १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. येवल्यातील घोषणेपासून नागपूरच्या धम्मदीक्षेपर्यंतचा हा प्रवास भारतीय समाजाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण पर्व ठरला. येवल्यातील ज्या भूमीवर परिवर्तनाचा संकल्प व्यक्त झाला, तिच भूमी पुढे ‘मुक्तीभूमी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यामुळे मुक्तीभूमी ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेचा विचार जपणारे प्रेरणास्थान बनली आहे. १६-१ चौकट करणे विकासातून मुक्तीभूमीला नवा चेहरा मुक्तीभूमीच्या विकासाला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून २००९ पासून गती मिळाली. सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांच्या विकासकामांतून येथे देखणे स्मारक उभारण्यात आले. विश्वभूषण स्तूप, विपश्यना सभागृह, भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि संरक्षक भिंत यांमुळे मुक्तीभूमीला नवे रूप प्राप्त झाले. शासनाने या स्थळाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जाही दिला आहे. सध्या पाली व संस्कृत अभ्यास केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, दृक्‌श्राव्य कक्ष, कलादालन, खुले रंगमंच, बैठक सभागृह, भिक्खू पाठशाळा, विपश्यनेसाठी खोल्या, भोजनगृह, कर्मचारी निवासस्थान, अंतर्गत रस्ते आणि सुशोभीकरणासह विविध कामे प्रगतीत आहे. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com