मुक्तीभूमी सामाजिक समता,स्वाभिमान अन परिवर्तनाचे प्रेरणास्थान

मुक्तीभूमी सामाजिक समता,स्वाभिमान अन परिवर्तनाचे प्रेरणास्थान
Published on: 
पान-३ सेकंड मेन YEO26B27146 येवला : मुक्तभूमीवर धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनानिमित्त अभिवादन करताना माजी खासदार समीर भुजबळ,आमदार पंकज भुजबळ अंबादास बनकर व पदाधिकारी. ----------------- मुक्तीभूमी समता, परिवर्तनाचे प्रेरणास्थान समीर भुजबळ ः मुक्तीभूमीकडे जाणाऱ्या नऊ कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१३ : दादरची चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमी आणि येवल्याची मुक्तीभूमी ही सामाजिक समता, स्वाभिमान आणि परिवर्तनाच्या चळवळीतील अत्यंत महत्त्वाची प्रेरणास्थाने आहेत. या स्थळांचा इतिहास म्हणजे केवळ स्मारकांचा इतिहास नसून, अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा आणि वंचित समाजाला आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा देणाऱ्या सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. मुक्तीभूमीकडे जाणाऱ्या ९ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला. मुक्तीभूमी येथे भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर येथे अभिवादन करण्यात आले, यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री संजय शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, माजी सभापती संभाजी पवार आदींची उपस्थिती होती. मंत्री शिरसाट यांनी मार्गदर्शन केले. माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले, ‘बाबासाहेबांनी दिलेला स्वाभिमानाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे आवश्यक असून मुक्तीभूमीकडे जाणारा रस्ता विकसित करण्यासाठी ९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने अनुयायांच्या प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.’ आमदार पंकज भुजबळ म्हणाले मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मुक्तीभूमीच्या विकासासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात आले आहेत. शासनाने पहिल्या टप्प्यात सुमारे १३ कोटी रुपये खर्चून विश्वभूषण स्तूपाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मुक्तीभूमीला अभ्यासक, विद्यार्थी, अनुयायी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ज्ञान व प्रबोधनाचे केंद्र म्हणून विकसित करण्यास मदत होत असल्याचे आमदार भुजबळ यांनी सांगितले. हुसेन शेख, दत्ता निकम, मोहन शेलार, अमोल शिंदे, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, दीपक लोणारी, प्रवीण बनकर, गोटू मांजरे, गुड्डू जावळे, गणेश शिंदे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, भूषण लाघवे, देविदास निकम, दीपक गायकवाड आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. ----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

पहिल्याच दिवशी हजारों भाविक जगदंबेच्या चरणी लिन! कोटमगावला समीर भुजबळ,रमेशगिरी महाराजांच्या हस्ते घटस्थापना,हजारांवर भाविक बसले घटी
भुजबळाच्या उपस्थितीत अमोल शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ते पदी नियुक्ती, प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे - भुजबळ
येवल्यात प्रत्येक प्रभागात नमो उद्यान उभारण्यास प्राधान्य द्या समीर भुजबळ : पटेल कॉलनीत नमो उद्यानाचे लोकार्पण
कुस्तीची ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी आधुनिक सुविधा देणार  येवला येथे विभागीय कुस्ती स्पर्धांचे समीर भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन
Marathi News Esakal
www.esakal.com