बहुभाषिक महिला कवी संमेलन

बहुभाषिक महिला कवी संमेलन
Published on: 
धुळे टुडे ३ साठी... --- फोटो-NSK26H31639 धुळे : बहुभाषिक महिला कवी संमेलनात साहित्य संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदानप्रसंगी डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांच्यासह नूतन पदाधिकारी. --- माता-भगिणींनी पिढ्यान् पिढ्या साहित्य जतन केलं --- डॉ. सदाशिव सूर्यवंशी; बहुभाषिक महिला कवी संमेलन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ७ : अहिराणी बोलीची ऐतिहासिक बाजू अत्यंत भक्कम असून ओवी आणि लोकसाहित्याच्या माध्यमातून आमच्या माता-भगिणींनी हे साहित्य पिढ्यांपिढ्या जतन केले आहे. सुख- दुःखाच्या प्रसंगी विविध ओवी वाङ्मयातून माय-माऊल्यांनी साहित्याची ही परंपरा पुढे नेली आहे, असे प्रतिपादन खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष व भाषा- साहित्य समीक्षक डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. खानदेश साहित्य संघ संचलित कवयित्री बहिणाबाई चौधरी महिला साहित्य संघाच्या धुळे शहर शाखेतर्फे रविवारी (ता. ४) एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या सभागृहात बहुभाषिक महिला कवीसंमेलन झाले. डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. महिला साहित्य संघाच्या राज्याध्यक्षा रत्ना पाटील अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी रोजचे जगणे आणि त्यातील सोसणे म्हणजेच आमचे साहित्य असल्याचे सांगत लेखणीला बळ देण्याची भावना व्यक्त केली. समीक्षक डॉ. योगिता पाटील, केंद्रीय सचिव रमेश बोरसे, डॉ. वैशाली पाटील यांनी कवितेचे बदलते स्वरूप आणि वास्तववादी लेखनाची गरज यावर मार्गदर्शन केले. हिंदी गझलकार प्रतिभा श्रीवास्तव यांनी सादर केलेल्या गझलेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ९८ कवयित्रींचा सहभाग या संमेलनात अहिराणी, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, कोकणी व आदिवासी बोलीभाषांमध्ये कविता सादरीकरण झाले. साडेचार वर्षांच्या बाल कवयित्रीपासून ते ८६ वर्षांच्या ज्येष्ठ महिला साहित्यिकांपर्यंत एकूण ९८ कवयित्रींनी आपल्या रचना सादर करून रसिकांची मने जिंकली. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे व मुंबई येथून महिला साहित्यिक उपस्थित होत्या. याप्रसंगी विविध पदाधिकाऱ्यांना साहित्य संघाची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. कवयित्री सुमन महाले यांनी प्रास्ताविक केले. पूनम सावंत- बेडसे यांनी सूत्रसंचालन केले. निशा अहिरे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती महाले, रेखा बारी, शोभा येवले, अरुणा शिरोडे, मीनाक्षी कोठावदे शकुंतला लोखंडे, रेखा वाणी, प्रमिला पाटील, मिनाक्षी चौधरी, शोभा पिंगळे, सुषमा बोरसे, कल्पना पाटील, निशा आहिरे, शामल पाटील, हर्षा चौधरी व इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com