मल्टीमॉडेल हबमुळे नाशिक रोडच्या विकासाला मिळणार ऊर्जितावस्था | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 मल्टी मोडल हबमुळे ग्रामीण भागाला ऊर्जितावस्था
मल्टी मॉडेल हब मुळे नाशिक रोडच्या विकासाला मिळणार ऊर्जितावस्था

मल्टीमॉडेल हबमुळे नाशिक रोडच्या विकासाला मिळणार ऊर्जितावस्था

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : सिन्नर फाटा येथील प्रस्तावित मल्टी मोडल हब प्रस्तावास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदील दाखविल्यामुळे या ठिकाणी महारेल, शहर बस व मेट्रो अशा तीन सेवा येणार आहेत. यामुळे नाशिक रोडच्या ग्रामीण भागाचे दळणवळण वाढून येथे उद्योग दळणवळण व रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार आहे. याचा फायदा माळेगाव एमआयडीसी मधील कंपन्यांना होणार आहे. नाशिकचे उपशहर म्हणून या भागाचा विकास होणार असल्यामुळे एकंदरीतच नाशिकच्या सर्वांगीण विकासाला ऊर्जितावस्था मिळणार आहे. एकच प्रकल्पात तीन सेवांची स्थानके येथे उभारले जाणार आहे.

त्यामुळे याठिकाणी कमर्शिअल कार्यालय, पंचतारांकित उपाहारगृह, हॉटेल, वैद्यकीय सेवा, कार पार्किंग, मल्टी सर्विसेस, तांत्रिक सेवा या उभाराव्यात लागणार आहेत. यामुळे सिन्नर फाटा, चेहेडी, सामनगाव, कोटमगाव, नाशिक रोड, शिंदे पळसे, जाखोरी, नायगाव, जायगाव या गावांमधील नागरिकांना उद्योग-व्यवसाय रोजगारासाठी ऊर्जितावस्था मिळणार आहे. शिवाय माळेगाव औद्योगिक वसाहतीतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्थानिक कंपन्यांना माल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मल्टी मॉडेल ट्रान्स्पोर्ट हबचा फायदा होणार आहे.

मल्टी मॉडेल हबमुळे येथील लोकांना रोजगार मिळणार आहे. स्वयंरोजगाराच्या संधी स्वतःहून चालून येणार असल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिक रोडच्या ग्रामीण भागाची एक नवीन ओळख निर्माण होईल. शिवाय शेतीशी निगडित प्रक्रिया उद्योगही विकसित होतील. - भारती ताजनपुरे, माजी नगरसेविका

रोजगाराची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होऊन दळणवळणला पूरक गोष्टी या प्रकल्पामुळे वाढणार आहे. नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे होणार असल्यामुळे पर्यटन, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होऊन नाशिकच्या एकंदरीत सर्वांगीण विकासाला वाव मिळेल. हॉटेल व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. - योगेश गाडेकर.

loading image
go to top