Mumbai- Agra Highway उजळणार 924 पथदिपांनी; 9 कोटींचा निधी

Street Lights
Street Lights esakal

नाशिक : मुंबई- आग्रा महामार्गावरील अंधाराचे साम्राज्य कमी होऊन अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने नाशिक शहरासह वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल प्लाझा आणि कोकणगाव शिवारातील सर्व्हिसरोड प्रकाशमय करण्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली त्यातून विजेचे ९२४ पोल उभारण्यात येणार आहेत.

प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे अंधारात महामार्गावर होणारे अपघात टळतील. अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. (Mumbai Agra Highway will illuminated with 924 street lights 9 crore fund by national highways authority Nashik Latest Marathi News)

आग्रा महामार्ग तसेच वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल प्लाझा आणि कोकणगाव शिवारातील सर्व्हिसरोडवर विजेचे पथदिपे बसविण्यासाठी आणि त्याच्या देखभाल करण्यासाठी आठ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.

नाशिक शहर परिसरातील मुंबई -आग्रा महामार्गाच्या ४० किलोमीटर अंतरावर दोनही बाजूच्या सर्व्हिसरोडसह पाचशे चौरेचाळीस, वणी जंक्शन ते पिंपळगाव टोल या दरम्यानच्या दहा किलोमीटरच्या अंतरावर ३२२ तर कोकणगाव शिवारातील सुमारे पावणे दोन किलोमीटर अंतरावर ५८ प्रखर उजेड देणारे एलईडी पथदिपे बसविल्यानंतर याच निधीतून त्यांची देखभाल होईल. एकूण पन्नास किलोमीटर अंतरात ९२४ विजेचे पोल उभारले जाणार आहेत.

"पावसाळ्यात अपघातांच्या प्रमाणात मोठया प्रमाणावर वाढ होत असते. या अपघातामुळे काहींनी जीव गमाविलेला असून अनेकांच्या वाट्याला कायमचेच अपंगत्व आलेले आहे. अंधाराचा फायदा घेत लुटारूंकडून रस्त्यावरील लुटीच्या घटना घडल्या आहेत. हे टाळण्यासाठी राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडे प्रयत्न सुरु आहे." - हेमंत गोडसे (खासदार नाशिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com