नाशिक रोड: नाशिक-मुंबई मार्गावरील खड्डे वादाचा विषय बनत असताना नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. येथील दत्तमंदिर सिग्नल चौकात महामार्गाच्या दोन्हीही बाजूने रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहने हळूहळू मार्गस्थ होतात. त्यामुळे काही दिवसांपासून येथे वाहनांची मोठी रांग लागत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. महामार्गावरील दत्तमंदिर सिग्नल चौकात सिन्नर व द्वारका बाजूकडून येणाऱ्या रस्त्यावर सिग्नलवरच खड्डेच खड्डे आहेत.