Nashik Mumbai highway
sakal
लक्ष्मण सोनवणे- गोंदे दुमाला: नाशिक- मुंबईला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ हा राज्यातील महत्त्वाचा जीवनवाहिनी मानला जातो. मात्र, या महामार्गावरील सहापदरीकरण व उड्डाणपुलांची, भुयारी मार्गाची कामे संथ गतीने सुरू राहिल्याने संपूर्ण मार्ग ‘कामांचे ठिकाण’ बनला आहे. ठिकठिकाणी वाहनांची कोंडी, खोल खड्डे, दाट धूळ आणि अपघातांची मालिका यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.