विद्यार्थ्याची लुटमार करणार्यास मुंबईत अटक

विद्यार्थ्याची लुटमार करणार्यास मुंबईत अटक
Published on: 
31482 नाशिक : लुटमार प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित व जप्त मुद्देमाल. समवेत शहर गुन्हेशाखा युनिट दोनचे पथक. विद्यार्थ्याची लूटमार करणाऱ्यास मुंबईत अटक सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : रिक्षाने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्याला अडवून, मारहाण करत रोख रक्कम व ऑनलाइन पैसे बळजबरीने घेणाऱ्या सराईत भामट्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मुंबईतून अटक केली. प्रबल संतोष नाडे (वय २४, रा. नागसेनवाडी, वडाळा नाका, नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार व मोबाईल असा एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी (ता. ३) पहाटे फिर्यादी विद्यार्थी शालीमार ते सीबीएस दरम्यान रिक्षाने प्रवास करत होता. येथील पाटील यांच्या बी-बियाणे दुकानासमोर कारमधून आलेल्या दोघा संशयितांनी रिक्षा अडवत काही एक कारण नसताना विद्यार्थ्याला शिवीगाळ व मारहाण करत त्याच्याकडून रोख रक्कम आणि ''फोन पे''द्वारे ऑनलाइन रक्कम बळजबरीने वर्ग करून घेतली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन पसार झाले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत असताना हवालदार अतुल पाटील, वाल्मीक चव्हाण यांना गुप्त खबर मिळाली. त्यानुसार, हा गुन्हा वडाळा नाका येथील प्रबल नाडे याने साथीदाराच्या मदतीने केला असून, तो मुंबईतील चेंबूर परिसरात लपल्याची माहिती मिळाली. सहायक निरीक्षक हेमंत मोहिते, उपनिरीक्षक गुलाब सोनार, अतुल पाटील, वाल्मीक चव्हाण, मनोज शिंदे व सुनील खैरनार यांचे पथक तात्काळ मुंबईकडे रवाना झाले. मुंबईतील सायन-ट्रॉम्बे रोडवरील डोमिनोज पिझ्झाजवळ संशयित कारसह आला असताना, नाशिक पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने एका विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com