इगतपुरी शहर: मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून बलियाकडे जाणाऱ्या कामायनी एक्स्प्रेसच्या रेल्वे इंजिनच्या पहिल्या बोगीच्या चाकांना शनिवारी (ता. २) दुपारी चारच्या सुमारास मुंढेगावजवळ ‘ब्रेक’ लागल्यामुळे चाकातून धूर आल्याने इंजिन चालकाने गाडी थांबवली. मात्र आग लागली नसून फक्त चाकाचे ब्रेक लायनरमधून धूर निघत असल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. २७ मिनिटांनंतर कामायनी एक्स्प्रेस नाशिक रोडकडे रवाना झाली.