नाशिक- राज्यात महापालिकांमध्ये जम्बो भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर नाशिक महापालिकेने सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तातडीची बाब म्हणून ६७१ पदांच्या भरतीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे महापालिकेत रिक्त जागांच्या भरतीचा मार्ग लवकरच मोकळा होणार असल्याचे संकेत आहेत.