Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी लोकांमधून निवडून आलेल्या नगरसेवकांमधून पक्षनिहाय स्वीकृत सदस्य होण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. एकूण सदस्यसंख्येच्या दहा टक्के स्वीकृत नगरसेवकांना प्रतिनिधित्व देण्याचा नियम आहे. त्यानुसार भाजपचे सहा, शिवसेनेचे दोन, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य स्वीकृतसाठी पात्र ठरणार आहे.