जुने नाशिक- महापालिकेने शहरातील अतिक्रमणविरोधी मोहिमेला गती देत नवश्या गणपती, आनंदवली, गंगापूर रोड, नाशिक रोड, उपनगर सिग्नल परिसर, शालिमार आणि मेन रोड भागात दिवसभरात टप्प्याटप्प्याने कारवाई केली. मात्र, नेपाळी कॉर्नर परिसरात ही मोहीम तणावपूर्ण ठरली. अतिक्रमण काढण्यास विरोध करत व्यावसायिकांनी गर्दी केली. त्यावर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमाव पांगवला.