esakal | स्वच्छ भारत अभियानासाठी नाशिक महापालिकेची तयारी सुरू; मानांकन घसरण्याचे कारण शोधण्यासाठी पाठपुरावा
sakal

बोलून बातमी शोधा

Swachh Bharat Abhiyan

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला तोंड देताना महापालिकेने पुनश्‍च हरिओम करताना पुढील वर्षाच्या स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्याची तयारी केली आहे. त्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, नियोजन केले जाणार आहे

स्वच्छ भारत अभियानासाठी नाशिक महापालिकेची तयारी सुरू; मानांकन घसरण्याचे कारण शोधण्यासाठी पाठपुरावा

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला तोंड देताना महापालिकेने पुनश्‍च हरिओम करताना पुढील वर्षाच्या स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्याची तयारी केली आहे. त्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, नियोजन केले जाणार आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी महापालिकेला मिळालेला गुणवत्तेच्या एक स्टार मानांकनात झालेल्या घसरणीचे कारण शोधण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला आहे.

मानांकन घसरण्याचे कारण शोधण्यासाठी पाठपुरावा

गेल्या वर्षी स्वच्छ भारत अभियानात सहभागी होताना पहिल्या दहाच्या यादीत येण्यासाठी महापालिकेने विविध उपक्रम राबविले होते. त्यात घनकचरा व्यवस्थापन, बायोमेडिकल वेस्ट संकलन, सार्वजनिक शौचालची स्वच्छता, घंटागाड्यांवर नियंत्रण आणण्यासाठी जीपीएस यंत्रणा बसविणे, कचराकुंडीमुक्त शहर करताना घनकचऱ्यापासून कोळसा तयार करणे, मृत जनावरांची विल्हेवाट लावणे आदी उपक्रम राबविले होते. स्वच्छतेचे रॅंकिंग करण्यापूर्वी केंद्र सरकारने मानांकन जाहीर केले होते. महापालिकेने उपाययोजना करूनही अवघा एक स्टार प्राप्त झाला होता. नाशिक महापालिकेच्या तुलनेत उत्पन्न व स्वच्छतेचे उपक्रमात मागे असलेल्या महापालिकांना तीन स्टार देण्यात आल्याने नाशिक महापालिकेने हरकत नोंदविली होती. स्वच्छतेच्या बाबतीत नाशिकची क्रमवारी ६७ पर्यंत घसरली होती. महापालिकेच्या हरकतींवर अद्याप उत्तर आले नसले, तरी २०२०-२१ या वर्षासाठी स्वच्छ अभियानात वरचा क्रमांक मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.

संपादन : रमेश चौधरी

loading image
go to top