Municipal Budget
sakal
नाशिक: सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ३०११.८५ कोटी रुपयांचे सिंहस्थ केंद्रित जमेचे अंदाजपत्रक महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला सोमवारी (ता.२) सादर केले. चार वर्षांच्या अंतराने लोकनियुक्त नगरसेवकांना विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी स्वेच्छा व प्रभाग विकास निधीसह प्रत्येकी ७६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली, तर म्युनिसिपल बॉण्ड व हरित रोख्यांतून सिंहस्थ विकासकामांची तरतूद करताना जाहिरात फलक, आकाश चिन्हांच्या करात १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त नागरिकांना करवाढीतून दिलासा मिळाला असला तरी मिळकती बीओटीवर देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.