Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: महापालिका प्रशासनाकडून आगामी आर्थिक वर्षासाठी तीन हजार ११ रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केल्यानंतर त्यात समिती सदस्यांकडून प्रभागातील विविध विकासकामांचा समावेश करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल होत आहेत. त्यातून जवळपास २५०-३०० कोटी रुपयांनी अंदाजपत्रकात वाढ होणार असल्याने यानिमित्ताने प्रशासनाचा अंदाज बिघडण्याची शक्यता आहे.