Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: येत्या दोन दिवसांत महापालिकेचे पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. अंदाजपत्रकावर अंतिम हात फिरविताना आर्थिक दायित्वाचा भार वाढताना दिसून येतो. जवळपास ६०० कोटी रुपये महापालिकेला विविध योजनांसाठी देय असल्याने महापालिकेचे अर्थकारण बिघडेल. त्यात नगरसेवकांच्या विकासकामांसाठी अधिक निधीची तरतूद करण्यासाठी दबाव वाढल्याने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.