Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक, ता. २७: चार वर्षांनंतर प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांच्या स्थायी समितीसमोर महापालिका प्रशासनाकडून अंदाजपत्रक सोमवारी (ता. २) सादर केले जाणार आहे. जवळपास तीन हजार कोटींवर अंदाजपत्रक पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कुंभमेळ्याच्या कामाव्यतिरिक्त नवीन विकासकामे हाती घेतली जाणार नाहीत. मात्र, नगरसेवकांनी सुचविलेल्या किमान दोन महत्त्वाच्या कामांचा अंदाजपत्रकात समावेश केला जाणार आहे.