Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांना पक्षनिहाय गटनोंदणी करणे बंधनकारक आहे. शासन राजपत्रात नोंद झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे नोंदणी बंधनकारक आहे. त्यानुसार राजपत्रात नावे प्रसिद्ध झाल्यानंतर महिनाभरात गटनोंदणी करण्याची कायदेशीर प्रक्रिया त्या पक्षांकडून पार पाडली जाणार आहे. विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी न झाल्यास मतदान प्रक्रियेत भाग घेता येणार नाही.