महापालिका रुग्णालयात कचरा कुंडीचे आगार!

महापालिका रुग्णालय
महापालिका रुग्णालयesakal

जुने नाशिक : मुलतानपुरा येथील महापालिका (NMC) सय्यदना माँ जी साहेबा रुग्णालयाचा वनवास संपता संपेना. सध्या रुग्णालय आवारात मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला दिसून येत आहे. रुग्णालय आहे की मग कचराकुंडीचे आगार, अशी शंका नागरिकाच्या मनात निर्माण होत आहे.

प्रभागातील नगरसेवकांच्या आपसांतील मतभेदामुळे मुलतानपुरा येथील रुग्णालय गेल्या अनेक वर्षापासून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. रुग्णालय सुरू नसल्याने परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रूग्णालय महापालिकेचे असले तरी त्याचे नूतनीकरण केल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यावरून नगरसेवकांमध्ये प्रचंड मतभेद आहे. त्यामुळे रुग्णालय वेठीस धरण्यात आले आहे. सुमारे 3 ते 4 वर्षापासून इमारत तयार होऊनदेखील रुग्णालय अद्याप सुरू झालेले नाही. गेल्यावर्षी १५ ऑगस्टचे औचित्य साधत पालकमंत्री (Guardian Minister) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्‌घाटन झाले. परिसरातील नागरिकांमध्ये रुग्णालय सुरू होण्याची आशा निर्माण झाली, परंतु घडले भलतेच.

महापालिका रुग्णालय
शहरातील अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ

दोन महिन्यानंतर उद्‌घाटनास एक वर्ष लोटणार आहे. अद्याप रुग्णालय सुरू होण्याचे तर दूर सध्याच्या कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कचरा टाकत आहे. शिवाय त्यांचे न वापरातील वस्तू रुग्णालय आवारात आणून ठेवले आहे. त्यामुळे रुग्णालयात कचऱ्याचे आगारसह भंगार बाजाराचे स्वरूप आले आहे.

महापालिका रुग्णालय
नाशिक : शहरात यंदा २०० मतदान केंद्रे वाढणार

नागरिकांचे आरोग्य निरोगी ठेवणारे रुग्णालय सध्या रोगी झाल्याचे बघावयास मिळत आहे. WHO अधिकाऱ्यांचा इशारा आणि परिसरातील रुग्णाची होणारी हेळसांड याकडे महापालिका (NMC) वैद्यकीय विभागाकडून दुर्लक्ष झाले आहे. इतकेच नव्हे तर वापराअभावी रूग्णालयाच्या खिडक्या तुटणे, वायरिंग तुटणे विविध प्रकारचे नुकसान होऊन रुग्णालय इमारतीस वापरापूर्वी अवकळा आली आहे. महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com