नाशिक निवडणूक | आघाडीच्या बालेकिल्ल्यात भाजपची कसोटी
नाशिक : काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे असे शिवसेना वगळता सर्वच पक्षांना कमी अधिक प्रमाणात स्थान देणाऱ्या या प्रभागात यंदा चुरशीची लढत होणार असली तरी जातीय समीकरणात दोन काँग्रेस, एक राष्ट्रवादी किंवा भाजप असा फॉर्म्युला राहील, असे चित्र सध्या तरी दिसत आहे. काँग्रेसच्या रूपाने महाविकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या प्रभागांमध्ये भाजपला आत्तापर्यंत संमिश्र यश मिळत असले तरी यंदा कसोटी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेची स्थापना झाल्यापासून दिवे कुटुंबीयांना या प्रभागाने साथ दिली. बहुसदस्यीय प्रभागरचनेत अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाला प्रत्येकी एक जागा राखीव असते. यंदादेखील तीन सदस्यांच्या प्रभागात या घटकांना प्रत्येकी एक अशा दोन जागा राखीव राहतील. अनुसूचित जमाती गटात उमेदवार आयात करण्याची वेळ येते. जाती गटात प्रत्येकवेळी चुरस निर्माण होत असली तरी दिवे कुटुंबीयांना मतदार साथ देतात, हा आजवरचा इतिहास आहे.
खुल्या प्रवर्गातील मतदान अधिक असल्याने या गटात अधिक उमेदवार एकमेकांसमोर लढतील. त्यामुळे येथे व्यक्ती विशेषत्वाला महत्त्व येणार आहे. महाविकास आघाडी घटकातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला या भागात संधी आहे. त्यातून महापालिकेत टक्का वाढेल. पक्षिय पातळीवर पॅनल तयार होत असले तरी अंतर्गत सेटिंग होत असल्याचा नेहमीचा अनुभव येथील मतदारांना येतो. यंदा प्रस्थापितांना रोखण्यासाठी अपक्ष मोठ्या प्रमाणात मैदानात उतरण्याची शक्यता आहे., मात्र यातून मत विभाजन अटळ असल्याने अपक्षांना मोट बांधावी लागेल. त्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
प्रभागाची व्याप्ती
बोधलेनगर, आंबेडकरवाडी, उत्तरानगर, यशवंतनगर, मेट्रो मॉल परिसर, सोनजेनगर, टाकळी गाव गावठाण, रामदास स्वामी मठ , गांधीनगर, ड्रीम सिटी, पोतदार स्कूल.
उत्तर ः नाशिक- पुणे रोड हनुमान सॉ मिलपासून १५ मी डीपी रस्त्याने उत्तरेकडे नासर्डी नदीपर्यंत. गोदावरी- नासर्डी नदी संगमापर्यंत.
पूर्व ः नासर्डी गोदावरी संगमापासून ३० मी डीपी रस्त्याने पुढे झिप्रे मळ्यापर्यत व दसक रस्त्यावरील क्षिरसागर मळ्यापर्यंत. टाकळी दसक १८ मीटर रुंद रस्त्याने टाकळी दसक शिवरस्त्यापर्यंत. टाकळी दसक शिव रस्त्याने जुन्या सायखेडा रोडवरील मकरंद कॉलनीतील श्रीयश बंगल्यापर्यंत.
दक्षिण ः जुना सायखेडा रोडवरील मकरंद कॉलनीतील श्रीयश बंगल्यापासून जुना सायखेडा रस्त्याने फर्निचर वर्कशॉपपर्यत. व तेथून १२ मी रुंद डीपी रस्त्याने खोडदेनगर रस्त्याने २४ मीटर रुंद टाकळी रोडपर्यंत. टाकळी रोडने गांधीनगर वसाहतीच्या हद्दीने पश्चिमेकडील व उत्तरेकडील भाग घेऊन नाशिक पुणे रोडपर्यंत.
पश्चिम ः नाशिक- पुणे रोड गांधीनगर वसाहतीच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून नाशिक- पुणे रोडने उत्तरेकडे पूर्वेकडील भाग घेऊन हनुमान सॉ मिल लगतच्या डीपी रस्त्यापर्यंत.
हे आहेत इच्छुक
राहुल दिवे, आरती दिवे, अनिल ताजनपुरे, आशा तडवी, मेघा साळवे, नितीन साळवे, सुषमा पगारे, रवी पगारे, प्रा. कुणाल वाघ, विजय ओहोळ, सुमन ओहोळ, वंदना मनचंदा, रमेश जाधव, सुनील जाधव, पूनम हिरे, दीपक हिरे, ज्योती जोंधळे, अनिल जोंधळे, कैलास वैशंपायन, कोमल साळवे, आकाश साळवे, संजय खैरनार, सुरेखा सहाणे, शशी पवार, शिवम पाटील, विनोद डोके, सचिन गायकवाड, राहुल गांगुर्डे, रंजना गांगुर्डे, रत्नमाला महाजन, प्रमोद पगारे, माधुरी पगारे, प्रवीण महाजन, नीलेश सहाणे, निनाद बरके, बाळासाहेब काठे, अरुण सैंदाणे, अनिल आवटे, अनिल गांगुर्डे, अमित कंटक, प्रकाश पाटील, पुनम डोके, उमेश जाधव, विद्या साबळे, आकाश साबळे, सागर शिरसाट, स्वाती राऊत, प्रकाश राऊत.