विक्रांत मते : नाशिक- महापालिकेने देवळाली कटक मंडळाचा नाशिक महापालिकेत समावेश करण्यास नकार दिल्याची बाब समोर आली आहे. उत्पन्नाच्या स्रोतांएवजी कॅन्टोन्मेंटकडून महापालिकेकडे वर्ग केले जाणारे देखभाल व दुरुस्तीचे प्रकल्प, वार्षिक करपात्र मूल्यामुळे कर वाढविण्यावर मर्यादा, एअर बेस असल्याने पंधरा कोटी रुपयांच्या सर्व्हिस चार्जवर सोडावे लागणारे पाणी, पायाभूत सुविधांवर पडणारा ताण, कर्मचारी वाढणार असल्याने पदांचा नवा आकृतिबंध या बाबी आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या नसल्याने उलट दायित्वाचा भार वाढणार असल्याने या महापालिकेने नकारघंटा वाजविली आहे.