Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

Strategic Road Development through Construction TDR Policy : रस्ते खोदाई व तोडफोड फी अन्यत्र वळविली जाणार नाही यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येणार आहे. यासाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Road Development

Road Development

sakal 

Updated on

नाशिक: शहर विकास आराखड्यात नमुद करण्यात आलेल्या ज्या रस्त्यांचा अद्याप विकास झाला नाही ते रस्ते विकसित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने बांधकाम टीडीआर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरसेवकांनी रस्ते सुचविल्यास महापालिका टीडीआर देणार आहे. तसेच रस्ते विकास करण्यासाठी प्रथमच शहरातील सहाही विभागातील ३१ प्रभागांकरिता एकूण १४४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात प्रत्येक प्रभागासाठी ४ कोटी ६५ लाखांचा निधी रस्त्याकरिता उपलब्ध होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com