Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांच्या व त्यानंतर विकास आघाडीच्या गुणांकनानुसार स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या नावाची घोषणा महापौर हिमगौरी आहेर-आडके केली. भाजपचे नऊ, शिवसेनेचे चार, शिवसेना (उबाठा)चे दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत समाविष्ट एका अपक्षाचा समावेश १६ सदस्यांच्या यादीत करण्यात आला. भाजपने सर्वाधिक सहा नवीन चेहरे दिले.