Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: महापालिकेचे कर व दर ठरविण्याचा अधिकार असलेल्या स्थायी समिती सदस्यांची निवड करताना भाजप व शिवसेना (उबाठा)ने नव्यांना संधी दिली आहे. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात सदस्यांच्या संख्येनुसार भाजपने ‘४-३- २’ या समीकरणानुसार सदस्यत्व दिले, तर शिवसेना (उबाठा)नेदेखील दोन नवीन सदस्यांना संधी देताना नाशिक रोड विभाग भक्कम केला आहे. मनसेला सोबत घेत शिवसेनेने गटनोंदणीची परतफेड केली, तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही सोबत घेतलेल्या अपक्ष नगरसेवकाला स्थायी समिती दिल्याने सोबत येणाऱ्यांचे ‘स्वागत’ केले.