8 दिवसात 1200 अतिक्रमणांवर बुलडोझर

NMC
NMCesakal

मालेगाव (नाशिक) : महानगरपालिकेने (Municipal Corporation) शहरातील सर्व रस्ते, गटारी, नाले तसेच महापालिकेच्या मोकळ्या भुंखडावरील अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई सुरु केली आहे. मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाने सलग आठ दिवस केलेल्या या कारवाईत सुमारे एक हजार २१७ अतिक्रमणे हटविली. सात ते आठ टेम्पो अतिक्रमणित साहित्य जप्त करण्यात आले. या मोहिमेमुळे विविध भागातील नाले व गटारींनी मोकळा श्‍वास घेतला असून, सांडपाणी वाहते झाले आहे.

NMC
नाशिक शहरात 10 ठिकाणी स्मार्ट पार्किंग

प्रशासनाने ही मोहिम राबविली असली तरी आगामी काळात या नाले व गटारींची नियमित स्वच्छता होणे गरजेचे आहे. आयुक्त भालचंद्र गोसावी, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त सतीश दिघे, सहाय्यक आयुक्त सुनील खडके यांच्या मार्गदर्शनाखाली चारही प्रभागात अतिक्रमण मोहिम राबविण्यासाठी दोन स्वतंत्र पथक करण्यात आले होते. यात २५ अधिकारी, कर्मचारी व दोन जेसीबी, दोन वाहने यांचा समावेश होता.

अतिक्रमण मोहिमेच्या आठव्या दिवशी प्रभाग समिती एक मधील संगमेश्‍वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुल ते रामसेतु पुल, चारा बाजार येथे मोहिम राबविण्यात आली. रस्त्यास अडथळा निर्माण करणारी व गटारीवरील स्लॅब, अतिक्रमण काढून गटार मोकळी करण्यात आली. २४ अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली. प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर, अतिक्रमण अधिक्षक शाम कांबळे, लिपीक विनय शिंदे, शैलेश सोळंकी, बीट मुकादम मनोहर धिवरे, दिलीप निकम व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

NMC
Fire Audit नसलेल्या रुग्णालयांचा पाणीपुरवठा खंडित होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com