Nashik Water Crisis : स्मार्ट सिटीच्या कामाचा फटका? नाशिकच्या पाणी प्रश्नावर ज्येष्ठ नगरसेवकांचा गंभीर आरोप

Corporators Raise Strong Objections Over Water Shortage : नाशिक महापालिकेच्या विशेष महासभेत अनियमित पाणीपुरवठा आणि रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार टीका करत सभागृहात संताप व्यक्त केला.
Water Crisis

Water Crisis

sakal 

Updated on

नाशिक: धरणात मुबलक साठा असूनही निर्माण झालेली कृत्रिम पाणीटंचाई व रस्त्यांवरील खड्ड्यांवरून नगरसेवकांनी सभागृहात प्रशासनाला धारेवर धरले. सिडकोच्या नगरसेवकांनी थेट अन्यायाची भावना व्यक्त केली, तर नाशिक रोडच्या नगरसेवकांनीदेखील आमच्यावरच अन्याय का, अशी भावना व्यक्त करत प्रशासनाकडून दुजाभाव मिळत असल्याचा थेट आरोप केला. सिडको, नाशिक रोडच्या नगरसेवकांच्या भूमिकेमुळे सातपूर विभागाचे काही नगरसेवकदेखील त्यांच्या भागातील पाणी समस्यांसाठी एकवटले. पंचवटी विरुद्ध द्वारका असा सामना पाहायला मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com