Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या मुख्य निवडणूक निरीक्षक सचेंद्र प्रताप सिंग यांनी शुक्रवारी (ता. २) निवडणूक तयारीचा आढावा घेतला. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी नऊशे मतदार मतदान करतील, या दृष्टीने नियोजन करत गर्दी टाळता येईल. व लांब रांगा लागणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.