Nashik Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीची तारीख जवळ येत असताना पॅनल म्हणून प्रचार होत असला तरी अनेक प्रभागांमध्ये क्रॉस वोटिंगची धास्ती उमेदवारांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे विरोधी पॅनलवर लक्ष ठेवतानाच स्वतःच्या पॅनलमधील उमेदवार एकमेकांवर ‘वॉच’ ठेवत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. क्रॉस वोटिंग झाल्यास संपूर्ण पॅनल निवडून आणण्याचे स्वप्न अनेक ठिकाणी धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.