Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी अभेद्य राहणार असून, जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वाधिक ६२ जागा मिळत असल्याने आघाडीत ते ‘मोठा भाऊ’ ठरणार आहे. त्यापाठोपाठ मनसेला २५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला २२, तर काँग्रेसला १३ जागा देण्यावर सहमती झाली आहे.