Chhagan Bhujbal, Manikrao Kokate
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिग्गज नेत्यांना प्रकृतीच्या कारणास्तव प्रचारापासून दूर रहावे लागले आहे. यात ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व धान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि माजी क्रीडामंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रचाराची संपूर्ण भिस्त माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर आली आहे.