Municipal Election
sakal
नाशिक: आणीबाणीच्या परिस्थितीत महायुतीत मोठा भाऊ असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेरीस महायुतीतील दोन छोटे भाऊ असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्तपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जागावाटपाची घोषणा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी (ता. ३०) दोन्ही पक्षांकडून जाहीर केली जाणार आहे.