Nashik Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत भारतीय जनता पक्षाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती जवळपास निश्चित झाली असून, केवळ दोन जागा वगळता ७०- ५० असे सूत्र रविवारी (ता. २८) रात्री उशिरा निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.