Election
sakal
नाशिक: महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी तिकीट मिळण्याआधीच समाज माध्यमांवर जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून, प्रभागातील मतदारांना आता दररोज सकाळी उमेदवारांचे संदेश यायला सुरुवात झाली आहे. काही वर्षांपूर्वी पावसात पार पडलेल्या सभेवरून समाज माध्यम निवडणुकीचे चित्र पालटण्यासाठी किती महत्त्वाची भूमिका बजावतात, त्याचा अनुभव अनेकांनी घेतला होता.