BJP vs Shiv Sena
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर शुक्रवारी चित्र स्पष्ट झाले आहे. अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्वाधिक सदस्य संख्या भाजपला मिळते की शिवसेनेला, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातही शहरात चौदा लढती लक्षवेधी ठरणार आहेत.