Girish Mahajan
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीत अनुकूल स्थिती असतानाही ७२ जागा मिळाल्या. चुका व अट्टहासामुळे ७२ जागांवर विजयाचा रथ अडकला. परंतु आता पुढच्या काळात गांभिर्याने वर्तन हवे, पक्षाची ध्येयधोरणे सोडून विरोधी वर्तन केल्यास सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा कुंभमेळा व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (ता. २१) दिला. तसेच बहुमत असल्याने महापौर, उपमहापौर भाजपचाच होणार असल्याचे स्पष्ट करताना शिवसेनेला विरोधी पक्षातचं बसावे लागेल, असे संकेत दिले.