Nashik Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा एक आठवडा शिल्लक असल्याने प्रचाराचा ज्वर वाढत चालला आहे. प्रचाराच्या शेवटच्या चार दिवसांत भाजप, शिवसेना- राष्ट्रवादी व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभांनी नाशिकचे मैदान गाजविले जाणार आहे. स्टार प्रचारकांच्या सभांमधून आरोप- प्रत्यारोपांची राळ उडविण्यात येणार असूनस कुठल्या पक्षाचे नेते काय आश्वासनांची खैरात करतात, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहील.