Municipal Election
sakal
इंदिरानगर: महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेपासून सुरू झालेल्या एबी फॉर्म नाट्याने शुक्रवारी (ता. २) माघारीच्या दिवशी टोक गाठले. सिडको विभागीय कार्यालयात नाट्यमय घडामोडी घडल्या असून, बडगुजर मायलेकांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय समीकरणे बदलली असतानाच, प्रभाग ३१ मधील उमेदवारीवरून भाजपचे अधिकृत उमेदवार बाळकृष्ण शिरसाठ आणि इच्छुक देवानंद बिरारी यांच्यात जोरदार झटापट झाली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.