Ravindra Chavan
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीत एबी फॉर्म वाटताना निर्माण झालेल्या गोंधळाची माहिती घेतली आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असून, चुका निश्चित झाल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून चुकांची जबाबदारी मी स्वीकारतो, अशी स्पष्टोक्ती रवींद्र चव्हाण यांनी दिली. घडलेल्या प्रकाराचे अवलोकन सुरू आहे. चुका करणाऱ्यांवर अनुशासन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. नाशिकमध्ये भाजपचा महापौर करण्यासाठी चुकांवर पडदा टाकून कामाला लागावे, असे आदेशही चव्हाणांनी दिले.