Deepak Badgujar, Mukesh Shahane
sakal
नाशिक: भारतीय जनता पक्षाच्या एबी फॉर्म वाटपात निर्माण झालेल्या गोंधळावरून सर्वाधिक चर्चेत आलेल्या प्रभाग क्रमांक २९-अ मधील भाजप अधिकृत उमेदवार दीपक बडगुजर आिण पूर्वाश्रमीचे भाजपचे व आताच्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढविणारे मुकेश शहाणे या दोघांमधील लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या लढतीतून एकाचा राजकीय उदय, तर दुसऱ्या उमेदवाराच्या राजकीय कारकीर्दीला धक्का, अशी परिस्थिती आहे.