Girish Mahajan
sakal
नाशिक: निवडणुका आल्या, की घराबाहेर पडणारे आणि ब्ल्यू प्रिंट दाखवून सत्ता मिळविणाऱ्यांनी नाशिकचा विकास केला नाही. या बोलघेवड्यांच्या हातात काहीच नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, अशी बोचरी टीका ठाकरे बंधूंची नावे न घेता मंत्री गिरीश महाजन यांनी केली. भारतीय जनता पक्षाचे ध्येय नाशिकच्या विकासाचे आहे. कुंभमेळ्यासाठी शहरात ३० हजार कोटींची विकासकामे सुरू असून, कुंभमेळा ऐतिहासिक होईल. नाशिककर विकासाच्याच बाजूने असल्याचा विश्वास राज्याचे जलसंपदामंत्री व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.