

नाशिक: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात ऐनवेळी काँग्रेस व शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिल्यानंतर पक्षाच्या कार्यालयाबाहेर रंगलेल्या नाट्यानंतर आता ज्यांना प्रवेश देण्यात आला त्यांच्यात फूट पडली आहे. उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार नितीन भोसले यांनी काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केल्याने पुन्हा एकदा या प्रभागातील वातावरण तापले आहे.