Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीत १२२ पैकी ७२ जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने नाशिकमध्ये निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असले, तरी महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबतची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. महापौरपदाचे आरक्षण निश्चित करणारी सोडत गुरुवारी (ता. २२) सकाळी अकराला मंत्रालयात काढली जाणार असून, त्यानंतर नाशिकच्या सत्ताकेंद्रावर नेमकी कोणती मोहोर उमटणार, हे स्पष्ट होणार आहे.