Nashik Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या युतीसंदर्भात रविवारी (ता. २८) रात्री उशिरापर्यंत निर्णय होऊ शकला नाही. मात्र जलसंपदामंत्री गिरीश महाजन व शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यात हॉटेलमध्ये बैठक झाली. तिचा तपशील बाहेर आला नसला तरी भाजपने यापूर्वी दिलेली ३५ जागांची भूमिका मागणी कायम ठेवली आहे. त्यात फार तर दोन ते तीन जागांची वाढ होऊन शिवसेनेला ३८ जागांवर समाधान मानावे लागेल, अशी माहिती सूत्रांना दिली.