Nashik Municipal Corporation election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेची युती जवळपास निश्चित झाली आहे. शिवसेनेकडून सन्मानपूर्वक जागांची मागणी करण्यात आल्याचे समजते. परंतु भाजपकडून ३२ जागाच देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे अधिक जागा वाढवून घेण्यासाठी बुधवारी (ता. १७) भाजप व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाशिकमध्ये बैठक होणार आहे.