Nashik Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान जवळ येत असताना विविध राजकीय आडाखे बांधले जात आहे. यंदा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण माजी नगरसेवकांपैकी ५६ माजी आमनेसामने मैदानात उतरले आहेत. त्यात पॅनलमध्ये माजी असलेले नगरसेवक पुन्हा निवडून आल्यास २८ नगरसेवकांना घरी बसावे लागणार आहे. अपक्षांनी बाजी मारल्यास घरी बसणाऱ्या माजी नगरसेवकांच्या यादीत वाढ होणार आहे.